f ही तीन मिनिटं तुमचं आयुष्य बदलेल जाणून घ्या..! | ThinkDum

ही तीन मिनिटं तुमचं आयुष्य बदलेल जाणून घ्या..!

 26-07-2020


 



माणूस जन्माला येतो हळूहळू मोठा होत जातो... तसतसा त्याला आजूबाजूच्या वातावरणाचा पर्यावरणाचे आणि परिस्थितीचा आकलन होत जातं... प्रत्येक गोष्टीत त्याला नाविन्य दिसतं... त्यामुळे एखाद्या गोष्टीने इजा होईल की नाही, ह्याचं भान नसल्यामुळे ते सतत हाताळत असतात... आपण जर पाहिलं तर असंच लहान बाळ त्याच्यामध्ये असणारी ऊर्जा तुम्ही पाहिली असेल कि, त्याला जे काही दिसेल ते पकडण्यासाठी ते धडपडतं आणि हातामध्ये जे काही भेटेल ते आपल्या इच्छेप्रमाणे आदळत आपटतं, तोंडात घेतं.. जे काही त्याच्या त्याला कळेल त्याप्रमाणे त्या वस्तूशी खेळतं... ती ऊर्जा वेगळीच असते... ऊर्जा प्रत्येक माणसामध्ये तेवत असते... पण आपण त्या ऊर्जेला अनभिज्ञ असतो.. आपल्याला कल्पना नसते की आपण काय करू शकतो? म्हणजेच आपल्यात आत्मविश्वास नसतो.. आणि म्हणूनच आपण कधीकधी सर्वसाधारण कामात देखील अपयशी ठरतो..

म्हणून सर्वात प्रथम आपण आपलं स्वतःचा आकलन करून स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करून इच्छित गोष्टीच्या साठी आत्मसमर्पण करून जर आपण एखादं काम हातात घेतला तर आपण ते निश्चित करू शकतो. म्हणून आयुष्यामध्ये कोणतेही काम करताना त्यामागची पार्श्वभूमी जाणून घ्या..! त्यासाठी लागणारे कष्ट करावेच लागेल याची जाणीव करून घ्या..! आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किती कालावधी लागेल? आपल्या ऐपतीप्रमाणे ते जाणून घ्या..! आणि यथाशक्ती आपण ठरवलेल्या वेळेत आपण काम कसा पूर्ण करू शकतो हे जाणून घ्या..! आणि आपलं आयुष्य बदलण्याची जिद्द मनात ठेवून आणि कामाला लागा बघा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल...

 credit: third party image reference

प्रत्येक माणूस आपलं स्वतःचं आयुष्य स्वतः घडवत असतो. कधीकधी अपेक्षित व्यक्तींची तो मदत घेत असतोच. आणि उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्यास सक्षम बनत असतो. पण कधीच हार पत्करत नाही. म्हणून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे आपणही सभोवतालचे निरीक्षण केले पाहिजे. आपण ही यशस्वी माणसांचा गोपीतं जाणून घेतले पाहिजेत... असं जर आपण केलं तर आपण नक्कीच आपल्या आयुष्याला वेगळं वळण देऊ शकतो.

हे सर्व करत असताना आपण यशस्वी व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुणाचंही मन न दुखवता आत्मीयतेने प्रसन्न मनाने, आनंदाने प्रयत्न करा नक्कीच आयुष्य तुमचं बदलेल आणि ती ताकद तुमच्यात आहे हे तुम्हाला जाणवेल...

लहान बाळांच्या मध्ये सुद्धा एनर्जी असते. हे आपण पाहिलेला आहे. वरील सांगितल्याप्रमाणे तुम्हीच आजूबाजूची लहान मुलं खेळताना बागडताना बघितली तर त्यांना कोणत्याही गोष्टीचे ज्ञान नसताना.. जी हातात गोष्ट भेटेल जी वस्तू भेटेल त्या वस्तूशी ती मनमोकळे खेळत असतात. त्यांच्यामध्ये जी ऊर्जा असते ती उर्जा त्यातुन ती बाहेर पडत असते. आणि हीच उर्जा आपल्या मोठ्यापणी देखील आपल्या मध्ये असते परंतु व्यवहारिक जीवनामध्ये आपण अनेक अडचणीत तडजोड करत असतो आणि वैचारिक स्थिती आपली स्थीर नसते त्यामुळे आपण ती एकाग्रता आणू शकत नाही. आणि म्हणूनच आपण आयुष्यामध्ये कुठेतरी कमी पडत असतो

धन्यवाद...


SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment