f सावधान इंडिया.. यामुळे कुटुंबात अनेक वाद निर्माण होतात | ThinkDum

सावधान इंडिया.. यामुळे कुटुंबात अनेक वाद निर्माण होतात



सावधान इंडिया...! यामुळे कुटुंबात अनेक वाद निर्माण होतात..


 


सावधानता बाळगणे गरजेचे आहे.


आयुष्यात आपण अनेक चुका करत असतो.. कधी कळत कधी नकळत.. पण कधीकधी या चुकांमुळे आपलं पूर्ण कुटुंब किंवा आपलं आयुष्य, आपलं जीवन सुद्धा बरबाद होऊ शकतो, याची कल्पना आहे. आणि आपल्याला देखील अनेक माध्यमां मार्फत याची माहिती मिळत असते. त्यासाठी आपण कौटुंबिक जीवन जगत असताना खासकरून सावधानता बाळगणे गरजेचे आहे.


कुटुंब म्हटलं की बायको, मुलं, आई-वडील त्यातच बहीण, भाऊ यांचा समावेश असतो. त्यामुळे सगळ्यांनी एकोप्याने राहणं एकमताने राहणं, समंजसपणे राहणे खूप गरजेचे असते. आणि प्रत्येकाची वैचारिक बाजू समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. यावरच आपलं कौटुंबिक सुख समाधान अवलंबून असतं.





विचार पटवून घेणं...


पण कधीकधी एखाद्या छोट्याशा कारणामुळे देखील आपलं कुटुंब आपलं परिवार ज्याला आपण वर्षानुवर्षे जोपासलेले असतं त्याला कुठेतरी गालबोट लागतं. कळत नकळत आपल्या विचारांमध्ये तफावत निर्माण होते, आणि वादविवादाला सुरुवात होते. त्यामुळे हे सर्व होऊ नये म्हणून आपल्याला सावधानता बाळगणे खूप गरजेचं असतं.


एकमेकांचे विचार समजून घेणं खूप गरजेचं असतं. एकमेकांचे विचार पटत नसले तरी समंजसपणे त्याच्यावर तोडगा काढणं गरजेचं असतं. कधी कधी अशी ठिणगी पडते की होत्याचं नव्हतं होतं.. पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातं... कुटुंबातील व्यक्तींचे आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं.. म्हणून अशा वेळेला समंजसपणे एकमेकांचे विचार पटवून घेणं खूप गरजेचं असतं.




संशयाने संसाराचे स्वप्न उध्वस्त..


कौटुंबिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीमध्ये जर संशयाने जर जागा घेतली तर त्यातून वाचणं खूप मुश्कील होऊन जातं. सततचे वादविवाद न पटणारे विचार.. जरी ते विचार समर्पक असतील तरी आपल्या मनात संशय असल्यामुळे पटेनासे होतात. म्हणून कौटुंबिक सुख आणि समाधानासाठी कोणत्याही व्यक्तीमध्ये संशयाचे ठिणगीने जर का शिरकाव केला, तर मग आपण त्याच अनुषंगाने त्या व्यक्तीकडे बघत असतो. आणि तर्कवितर्क लावत असतो आणि आपल्या मनामध्ये संशय आणखी बळकट होऊ लागतो. पुढे सुखी संसाराची राखरांगोळी होऊन जाते.


म्हणून कौटुंबिक व्यक्तींमध्ये जर संशयाने जागा घेतली तर समंजसपणे त्याचे विश्लेषण करून एकमेकांचे विचार पटवून घेऊन त्याच्यावर शक्य तितक्या लवकर तोडगा काढणे खूप गरजेचं असतं नाहीतर आपण पाहिलेलं सुखी संसाराचे स्वप्न उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही.





संशय अख्ख्या कुटुंबाची राखरांगोळी करू शकतो...


आपल्या मनामध्ये जर का संशयाने जागा घेतली की मग आपण समोरच्या व्यक्तीला तर्किक दृष्टीने बघू लागतो, आणि जर तर वर आपले विचार ठाम करत असतो. इथे आपण चुकतो आणि आपलं मोठ्या कष्टानं उभं केलेलं सुखी संसार धुळीस मिळतो.


म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की कधीही आपल्या मनामध्ये जर का संशय निर्माण झाला तर त्याचं शक्य तितक्या लवकर तोडगा काढणं खूप गरजेचे आहे. म्हणून कधीही एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात आपल्या मनामध्ये जर का संशय निर्माण झाला तर, त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन, योग्य तो उपाय करून, विचार परिवर्तन करून त्याला जाणून घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण एखाद्या व्यक्तीवर संशय आलेला संशय दूर करू शकतो.म्हणून कौटुंबिक जीवनामध्ये कधीही कौटुंबिक व्यक्तीने त्याला थारा देऊ नये कारण संशय अख्ख्या कुटुंबाची राखरांगोळी करू शकतो. तेव्हा सुखी कौटुंबिक जीवन जगत असताना तत्परता बाळगणे खूप गरजेचा आहे.

अशा पद्धतीने जर का आपण आपल्या कौटुंबिक जीवन जगायला सुरुवात केली तर नक्कीच आपलं कौटुंबिक व्यक्तींचा जीवन सुखी समाधानाने जगता येईल.


समाजामध्ये अशा अनेक व्यक्ती वावरत असतात की ज्यांना आपल्या कौटुंबिक सुख पहावत नाही, त्यांच्या मनामध्ये आपल्या संसाराबद्दल आपल्या कौटुंबिक सुखाबद्दल नकारात्मक भावना असते त्यामुळे अशी व्यक्ती कौटुंबिक व्यक्तीच्या मनामध्ये संशय निर्माण करून देते आणि आपल्या सुखी संसार उध्वस्त करते त्यामुळे समाजामध्ये अशा व्यक्तींना ओळखून त्यापासून चार हात दूर राहणेच खूप महत्त्वाचा आहे.






सावधानता बाळगा....!


आपल्या समोरचा व्यक्ती कितीही विश्वासातला असला, कितीही जवळची असली, कितीही शुभचिंतक असली तरी त्याच्याजवळ कुटुंबातील कौटुंबिक जीवनाबद्दल कोणतेही विश्लेषण करू नका कारण अशी एखादी वेळ येते की तुम्ही ज्या गोष्टीचा विश्लेषण केले असता त्याचा गैरफायदा घेऊन आपलं सुखी संसार उद्ध्वस्त करायला कारणीभूत होऊ शकतो.


सुखी संसार जगत असताना प्रत्येकाने सावधानता बाळगा....!

धन्यवाद...!

SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment