Secret of Success|
तो रडला...! पण जिगरी ने लढला..! खरं काय..?
त्यानं अनेक संकटांशी सामना केला... परिस्थितीने त्याला कधीच साथ दिली नाही.... प्रत्येक गोष्टीची चणचण भासत असताना.... शारीरिक अवयव साथ देत नसताना.. मानसिक संतुलन बिघडले असताना..... स्वतःला जराही ढळू न देता... जरी डोळ्यातून अश्रू आले तरीही तो मागे हटला नाही.... जिगरी ने लढला, आणि विजय सुद्धा झाला..! अशा या सर्वसाधारण नाहीतर
असाधारण व्यक्तीच्या यशाची ही गोष्ट...!
ध्येय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं..
ध्येय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, हलाखीचे जीवन जगत असताना... वर्तमान परिस्थितीचे भान असताना... अनेक गोष्टींची तडजोड करून सदैव लढत राहिला... त्याने कधीच चिंता बाळगली नाही. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांना आत्मबळ निर्माण केलं... त्यानंच इच्छाशक्ती निर्माण केली... सकारात्मक विचारांची सांगड घातली... आणि सदैव प्रयत्न करत राहीला.. ध्येयनिश्चितीसाठी दिवस-रात्र झटला.... विचारांची लढाई लढली... पर्यावरणाची तमा बाळगली नाही.... परिस्थितीशी कधी हात मिळवणी केली नाही... पण तो लढला आणि विजयी सुध्दा झाला....!
यशाची भूक..
त्याला भूक होती ती फक्त यशाची.... यश त्याला हवं होतं... यासाठी तो झगडत राहिला... कोणत्याही गोष्टीची
तमा बाळगली नाही.... कधीही तक्रार केली नाही.., कोणत्याही गोष्टीचं कारण दाखवलं नाही.... सदैव मनात इच्छा ठेवली ती यशाची... यशाची ज्योत कधी विझु दिली नाही.... अशा या व्यक्तीची ही गोष्ट.... जन्माला आलेल्या त्या व्यक्तीची गोष्ट... परिस्थितीशी कधी हातमिळवणी केली नाही, आणि सदैव विजय प्राप्त व्हावे ही इच्छा बाळगून... ही गोष्ट मी मिळवणारच हे ध्येय उराशी बाळगून... काहीही झालं तरी मला हे यश संपादन करायचच हा मनाशी ठाम निश्चय करून, तो लढला आणि तो विजयी झाला.....!
जगाला दाखवून द्यायचं की....
जन्माला आलोय म्हणून जसं जगायचं तसं जगायचं असा कधीच विचार केला नाही... जगाला दाखवून द्यायचं की आपणही आपलं अस्तित्व निर्माण करून जगाला दाखवून द्यायचं की आपणही आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो... जगाला दाखवून द्यायचं की होय यश मीही संपादन करू शकतो.. जगाला दाखवून द्यायचं की, तुम्ही कितीही मला बोला, काहीही बोला मी त्याची तमा बाळगत नाही.. फक्त मला यश हवं आहे आणि ते मी मिळवणारच.. !
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...!
माझा जन्म कोणत्या परिस्थितीत झाला याच्याशी माला देणेघेणे नाही... मी कोणत्या परिस्थितीत जगतोय याच्याशी मला देणेघेणे नाही... मला कोणत्या सुखसोयी मिळाला नाही याची माझी तक्रार नाही.. मला फक्त माझी परिस्थिती बदलायची आहे. आणि मला माझी परिस्थिती बदलायची असेल तर त्यासाठी मीच कारणीभूत आहे.. आणि मीच माझी परिस्थिती बदलू शकतो.. मला माहित आहे की, 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हे वाक्य जसं आहे तसाच कुणीही तुमची परिस्थिती बदलायला येणार नाही... याची मला जाणीव आहे. आणि म्हणूनच मी लढत राहणार.. आणि माझ्या परिस्थितीवर विजय मिळवणार आणि ही परिस्थिती बदलून दाखवणार कारण मीही एक माणूस आहे हे जगाला दाखवून देणार...
माणसाची गौरव गाथा....
अशीही अशी ही माणसाची गौरव गाथा... तर मित्रांनो ही कथा आहे सर्वसाधारण आपल्यातल्याच एका माणसाची आपल्यातल्याच एका व्यक्तीची... तुमची-आमची आणि माझी, तुझी सुद्धा तेव्हा कोणतीही गोष्टी जर आपल्याला साध्य करायचं असेल तर या लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जर विचार केला तर यश आपलंच असतं... म्हणून कितीही जरी आपल्याला हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि कितीही काबाडकष्ट करावे लागले.. तरी करा... लढत रहा आणि यशस्वी व्हा........!
Nice article
ReplyDeleteNice article 👍🤠👍
ReplyDelete