
सकाळी उठल्यानंतर प्राथ विधी उरकून झाल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर सुर्याची किरणे (किंचित क्षणासाठी) आपल्या डोळ्यावर आणि आपल्या शरीरावर काही वेळापुरती तरी पडू द्या ! इच्छित देवाला मनोभावे नमस्कार करा..! मनामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी न ठेवता प्रसन्न मनाने काही वेळ तरी नतमस्तक व्हा ! गतकाळातल्या सुखद घटना आठवा..! मन प्रसन्न करा ! कोणत्याही निगेटिव्हिटी असेल तिकडे दुर्लक्ष करा ! ज्या कामासाठी बाहेर जातोय त्यासंदर्भात प्रबळइच्छाशक्ती ठेवा ! सकारात्मक भावना ठेवा!

स्वच्छ साफ कपडे परिधान करा ! स्वच्छ साफ आणि समर्पक रंगसंगती असणारे कपडे परिधान केल्यानंतर आरशासमोर उभे रहा ! छोटीसी स्माईल करा स्वतःसाठी ! मनात ठरवा आज जे काम होणार आहे ते होणारच आहे ! जर तुम्ही ऑफिसला कामासाठी जात असाल.. बॉसचा चिडचिडेपणा, पेंडिंग राहिलेले काम सवंगड्यांची टोमणे, इतरही अनेक मनाला वेदना देणाऱ्या गोष्टींसाठी अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा ! आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करा !

प्रत्येक जण आपल्या ठिकाणी योग्य असतो. प्रत्येक जण समोरच्याला आपल्या दृष्टिकोनातून बघत असतो. त्यामुळे समोरच्या मनामध्ये आपल्या संदर्भात काय भावना आहेत याचा विचार अजिबात करू नका ! स्वतः विचार करा आपण देखील कोणाबद्दल तरी त्याच भावनेने बघत असतो, तोच विचार करत असतो. तेव्हा अशा छोट्या-मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा..! सकाळपासूनच आनंदी राहाण्याचा निश्चय करा ! आणि फक्त सकारात्मक भावना ठेवा ! योग्य परीधानामुळे तुमच अंतर मन खुपच प्रफुल्लित असेल, त्यामुळे पूर्ण दिवस तुमचा आनंदमय जाईल ! शंकाच नाही ! एकदा प्रयत्न करून बघा !

जिवनात छोट्या मोठ्या अडचणींना सामोरे जात आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर आपण दीर्घकाळ निरोगी राहू शकतो. कारण आपला अंतर्मनच आपल्याला आतून कलुषित करत असतं, रोगी बनवत असतं. म्हणून जेवढा आपण आनंदी राहू, हसत राहू, खेळत राहू, स्वच्छंदी राहू तेवढं आपण निरोगी राहू ! शास्त्र सांगतं.. !
धन्यवाद...!
0 comments:
Post a Comment