Ajab Gajab Duniya | अर्धवट जळालेला मृतदेह घरी ठेवायचं असतं..! पण का..?
![]() |
Ajab Gajab Duniya |
अंत्यसंस्काराची अजब पद्धत..
जगात मृत देहावर अंत्यसंस्कार करण्याचे दहन आणि दफन असे दोन प्रकार आहेत. काही देशात मृतदेह जपून ठेवण्याची पद्धत आहे. या प्रकाराला मम्मी म्हणतात आणि ही परंपरा इजिप्त मध्ये पहायला मिळते. परंतु पापुआ न्यु गिनिआ (Papua New Guinea) या देशात अंत्यसंस्काराची अजब पद्धत आहे.![]() |
असा मृतदेह घरी ठेवतात |
प्रचलित परंपरा...
पापुआ न्यु गिनीआ (Papua New Guinea ) या देशात मृतदेहावर अग्निसंस्कार करतात म्हणजेच दहन करतात. भारतासारख्या देशात मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर तिसऱ्या दिवशी अस्थी व राख गोळा करून नदीत किंवा समुद्रात विसर्जित करतात; पण पापुआ न्यु गिनिआ या देशात अंत्यसंस्काराची अजब प्रथा आहे.तिथे आदिवासींमध्ये आजही ही परंपरा प्रचलित आहे.
![]() |
हे आदिवासी स्मृती जतन करतात |
वर्षानुवर्ष जतन करतात मृतदेह..
हे लोक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना मृतदेह पुर्ण जळु देत नाही. अर्धवट जळालेल्या मृतदेहाला घरी परत आणतात व जपून ठेवतात ही प्रथा खूपच प्राचीन आहे. याला त्या मृत व्यक्ती विषयी असलेला जिव्हाळा की ही अनिष्ट प्रथा म्हणावी असा मनात संभ्रम होतो. हे आदिवासी त्यांच्या कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाला तर त्याची स्मृती जतन करण्यासाठी आणि अग्निसंस्कार केल्यावर पुन्हा घरी आणतात व वर्षानुवर्षे जतन करून ठेवतात. काही घरांमध्ये तर मृतदेह दोनशे पन्नास वर्षापासून जपून ठेवण्याची अनेक उदाहरणे सापडतात.
![]() |
अर्धवट जळालेला मृतदेह |
संस्कृतीचे जतन..
म्हणजेच अर्धवट जळालेला मृतदेह घरी ठेवतात ही प्रथा त्यांच्या रुढी परंपरेने वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. हे आपल्याला अजब वाटत असलं तरी ती त्यांची संस्कृती जतन करत असतात असेच म्हणावे लागेल.
![]() |
पापुआ न्यू गुइनिया |
अशीच अनेक अजब गजब उदाहरणे आपल्याला मिळत असतात...
Nce.....hope will gat same and different article fir reading...keep it up
ReplyDelete