f तुमच्यावर संकट ओढवलय..? हिम्मत नका हारु.. फक्त हे करा... | ThinkDum

तुमच्यावर संकट ओढवलय..? हिम्मत नका हारु.. फक्त हे करा...


credit: third party image reference
माणसाच्या आयुष्याला सुखदुःखाची झालर आहे, म्हणूनच माणसाचं आयुष्य सुंदर आहे. फक्त सुख असतं माणसाच्या आयुष्यामध्ये तर माणूस स्वच्छंदी झाला असता. जसं पाहिजेत तसं वागला असता. कोणत्याही गोष्टीची काळजी न करता. कोणाचीही काळजी न करता. आपल्या मनासारखा वागला असता. आणि एक खूप मोठा पेच निर्माण झाला असता. परंतु माणसाच्या आयुष्यात दुःख आहे, म्हणून माणूस जे पण काय करतो ते विचारपूर्वक करत असतो. कारण त्याला माहिती असतं, जर का बरं वाईट केलं तर आपल्या वाट्याला दुःख उद्भवेल. परंतु काही माणसं अशी असतात की या गोष्टीचा विचार न करता आपल्या स्वार्थासाठी काहीही करायला तयार असतात. आणि शेवटी कधी न कधी त्यांना ही दुःखाला सामोरं जावं लागतं.
credit: third party image reference
असंच कधीतरी तुमच्याही वाटायला दुःख आलं असेल. येत असेल. एवढे दुःख ओढवलं असेल की तुमच्या सहनशक्तीच्या पलिकडचं होतं असेल. परंतु त्या वेळेला हा विचार करायचा की या भूतलावर या पृथ्वीवर ज्या पण मानवाने जन्म घेतलेला आहे त्याच्या वाट्याला दुःख असणारच..! पहिल्यांदा हा विचार करून आपण दुःखाला सामोरे जायचं. कारण दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येत असतं. तेव्हा आपल्याला सहन केल्याशिवाय काही पर्याय नसतो. त्यासाठी आपण त्याला सरळ सामोरे जाऊन फक्त हाच विचार करायचा की हे जे दुःख आहे हे संकट आहे ते काही काळापुरतेच आहे. काही काळानंतर काही वेळेनंतर हे दुःख संपणार आहे. त्यानंतर आपण मुक्त दुःखमुक्त होणार आहोत. दुःखा मुळे खचून न जाता त्याला सामोरं जावं...!
credit: third party image reference
आपण कधी दुःखी झालात तर सर्वात जवळच्या व्यक्तीला विश्वासातली व्यक्तीला, किंवा मित्र-मैत्रिणीला, शेअर करा. एकट्याने ते दुःख आतल्या आत कुढत बसू नका त्यामुळे तुम्ही आणखी दुःखी व्हाल आणि न सांगता कदाचित विपरीत परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून जे काही दुःख आहे ते तुम्ही शेअर करा..! खास मित्रांना नातेवाईकांना जेणेकरून आपले दुःख हलकं होईल. परंतु आपल्या आयुष्यात कधीही तुम्ही हार मानू नका. जगण्याचा प्रयत्न करा...
credit: third party image reference
..त्यासाठी आपल्या आजूबाजूला, रस्त्याने चालताना, बाजारात, मंदिराजवळ अशी अनेक माणसं असतात की त्यांना जन्मापासूनच दुःख, यातना त्यांच्या वाट्याला आलेले असतं तरीही ती लोक जगण्याचा प्रयत्न करत असतात. तेच डोळ्यासमोर ठेवा आणि प्रेरणा घ्या आणि दुःखाला सामोरे जा. त्यातून मार्ग काढून सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करा..! शेवटी आपणच आपले सारखे असतो एवढे लक्षात ठेवा..
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment