
जगात दोनच जबरदस्त शक्ती आहेत. एक निसर्ग शक्ती आणि एक मानवी विचार शक्ती. मानवी विचारशक्ती निसर्गावर मात करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. पण काही विशिष्ट नैसर्गिक आपत्तीला माणूस तोडगा काढू शकत नाही. आणि त्यामुळे निसर्ग शक्तीपेक्षा मानवी विचार शक्ती कमकुवत ठरतं आहे. पण कधी कधी मानवी विचार (Willpower) शक्तीसुद्धा इतकी जबरदस्त ऊर्जा निर्माण करू शकते की त्याच्यासमोर विज्ञानालाही हार पत्करावी लागते. असच काहीसं सत्यघटनेवर आधारित हा लेख आहे.
जबरदस्त (Willpower) इच्छाशक्ती असणार्या मुलीच्या बाबतीत घडलेली सत्य घटना. नाव अरूणिमा सिन्हा.

अरूणिमा या हॉलीबॉल प्लेयर. राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या.
एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लखनऊ ते दिल्ली असा रेल्वे प्रवास करताना, ट्रेनमध्ये त्यांच्यावरती चोरांनी हमला केला. सोनसाखळी खेचण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांनी अरूणिमा यांना ट्रेनच्या बाहेर फेकलं. अरूणिमा बाजूच्या रेल्वे रुळावर पडल्या. त्यात त्यांच्या डावा पायावरुन दुसऱि ट्रेन गेली.त्यात त्या गंभीर रित्या जखमी झाल्या. चेतना अवस्था त्यांची जागृत असल्यामुळे, त्यांना जाणवत होतं की आपल्या बाजूने ट्रेन जात येत आहेत. आणि रेल्वे रुळावर फिरणारे उंदीर घुशी आपला डावा पाय कुरतडत आहेत. तशाच अवस्थेत त्या जवळ जवळ पुरी रात्र पडून राहिल्या. नंतर हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना उपचार झाल्यानंतर त्यांना जाणवलं की त्यांचा डावा पाय कापला गेला आहे. त्यावेळी त्या खुपच अस्वस्थ झाल्या. आता काय ? असा प्रश्न पडला. त्याच वेळेला पेपर मध्ये त्यांना वाचायला मिळतं, की अरूणिमा यांनी मानसिक बिमारी मुळे आत्महत्या करायचा प्रयत्न केला. हे त्यांच्या खुपच जिव्हारी लागलं आणि ते स्वतः ला शाबित करण्यासठी माऊंट एव्हरेस्ट सर करायचं निर्धार केला. आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी न जाता सरळ ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊन ट्रेनिंग ला सुरुवात केली....

आणि...?
अपार कष्टाने भरलेल्या दोन वर्षाच्या कठीण परिश्रमाने ट्रेनिंग पुरी केल्यानंतर त्यांनी माऊंट एव्हरेस्ट च्या सफर ची सुरुवात केली वेदना आणि मृत्यू या खड्ड्यातून बाहेर पडत बावन्न दिवसानंतर जे झालं त्यांना सारी दुनिया हैराण झाली अरूणिमा या माउंट एव्हरेस्टच्या उंच शिखरावर विराजमान झाल्या होत्या आणि त्यांनी इतिहास घडवला माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली विकलांग महीला. 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान केला गेला.
एक कृत्रिम पाय असूनदेखील एव्हरेस्ट शिखर सर चढून त्यांनी दाखवून दिलं की आपली इच्छाशक्ती प्रबळ असली की आपल्याला काही आणि कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
या घटनेवरून आपण समजू शकतो की आपली प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मक भावना जर असेल तर मग कोणतीही गोष्ट आपण साध्य करू शकतो.

असा. हा लेख प्रेरणादायक, सत्यघटनेवर आधारित. अरुणिमा ला आदर्श समजून जर एखादा कार्य आपण केला तर नक्कीच आपल्याला यश प्राप्त होईल.

अरूणिमा सलाम तुमच्या कर्तुत्वाला सलाम तुमच्या इच्छाशक्तीला. म्हणूनच मी सांगितला जर तुम्ही सत्यघटना ऐकलीत तर तुम्ही कधी हार पत्करणार नाही. तर आपण विचार करायचा आहे, की आपल्याला जे साध्या करायचं आहे ति गोष्टी साध्य करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम करायची तयारी असेल तर काहीही आपल्याला अशक्य नाही....!
Thanks Dear....!
ReplyDelete