![]() |
Savdhaan india..! Coronavirus | दहशतवादी हल्ल्यापेक्षा ही खतरनाक |
गेल्या काही महिन्यांपासून चीनमध्ये कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. माणसाचं जनजीवन विस्कळीत होऊन त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. जीवनाची काही शेवटचे क्षण तिथे काही नागरिक मोजत आहेत. अशी भयानक परिस्थिती चीनमध्ये निर्माण झालेली आहे. त्यातच सर्वात जास्त वुहान मध्ये याची गंभीर समस्या उद्भवलेली दिसते. या सर्वांचा जर विचार केला तर आजची परिस्थिती चीनमध्येच काय सर्व जगामध्ये दहशत निर्माण झालेली जाणवते.
![]() |
Savdhaan india..! Coronavirus | दहशतवादी हल्ल्यापेक्षा ही खतरनाक |
चीनमध्ये थैमान माजविणारे कोरोना विषाणूंचे संकट हे कोणत्याही दहशतवादी हल्ल्या पेक्षा भीषण आहे. उर्वरित जगासाठी हा अतिशय गंभीर धोका आहे. आज घडीला जगासमोर हा सर्वात मोठा शत्रू आहे. असा इशारा जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने दिला आहे. प्राणघातक कोरोना विषाणूने चीनमध्ये एकुण 3158 जणांचा बळी घेतला असून आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 80790 जणांना याची लागण झाली आहे. जवळपास अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूला 'COVID-19' असं अधिकृत नाव देण्यात आले आहे.
![]() |
Savdhaan india..! Coronavirus | दहशतवादी हल्ल्यापेक्षा ही खतरनाक |
जिनेव्हातील एका परिषदेदरम्यान डब्ल्यूएचओने कोरोनाला अधिकृतरित्या 'COVID-19' असे नाव देण्यात आले आहे. कोरोना व्हायरस या शब्दापासून आणि यावर्षी यांचा उदय झाला त्या आधारे नवीन नाव देण्यात आले आहे. दरम्यान चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार 31 प्रांतीय स्तरावर विविध भागात कोरोनामुळे आणखी काही जणांचा बळी गेला आहे. कोरोना व्हायरस विषाणूंचा एक मोठा समूह आहे यातील फक्त 6 विषाणूंचा मानवाला धोका आहे.
![]() |
Savdhaan india..! Coronavirus | दहशतवादी हल्ल्यापेक्षा ही खतरनाक |
काही दिवसांमध्ये हा विषाणू जगभर पसरला असून आणि एखाद्या दहशतवादी हल्ला पेक्षाही गंभीर परिणाम करू शकतो. म्हणून जगाने सावधानता म्हणून ह्या वरती उपाय शोधणे गरजेचे आहे. सर्वजण दहशतीखाली वावरत आहे एवढा मोठा भयानक विषाणू आज दहशतवादी हल्ला पेक्षाही खूप मोठा गंभीर धोका निर्माण करू शकतो हे आता जाणवू लागला आहे. आता इतर देशांप्रमाणेच भारतात देखील ह्या विषाणू ने शिरकाव केला असून 50 पेक्षा जास्त रुग्ण कोरोना विषाणू ने बाधित झाले आहेत. तेव्हा प्रत्येक व्यक्ती ने सावधानता बाळगावी म्हणून अनेक प्रकारे सावधानतेचा इशारा दिला जात आहे. तेव्हा वैद्यकीय व्यवस्थेला प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावे आणि नियमांचे तंतोतंत पालन करून या विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून दक्षता बाळगावी.
धन्यवाद....!
0 comments:
Post a Comment