
मुंबई : भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेलं शहर..! महाराष्ट्र राज्याची राजधानी..! मुंबई शहराची लोकसंख्या जवळजवळ तीन करोड च्या आसपास आहे. देशातल्या पहीलं सर्वाधििक लोकसंख्या असलेलं शहर मुंबई..!
असं म्हणतात की ल्हावा निर्मित छोट्या-छोट्या सात द्विपा पासून तयार झालेल्या बेटावर वसलेलं शहर म्हणजेच मुंबई..!
मुंबई बंदर हे भारतातलं सर्वात श्रेष्ठ बंदर आहे.
युरोप, अमेरिका, आफ्रिका इत्यादी पश्र्चिमी देशातून समुद्रामार्गे किंवा हवाईमार्गे येणारे पर्यटक सर्वात प्रथम मुंबईमध्ये येत असतात. म्हणून मुंबईला भारताचे प्रवेशद्वार असं म्हटलं जातं. तसेच मुंबईला स्वप्नांची नगरी म्हणून देखील संबोधले जाते.

पण आता याच मुंबई शहरावर धोक्याची-घंटा घोंगावू लागली आहे. वायुप्रदूषणामुळे तापमानात सतत वाढ होत आहे. हे वाढते तापमान शहराच्या मुळावरच उठले आहे. वाढत्या तापमानामुळे ध्रुवीय हिमनग वितळत आहेत. त्यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. ती अशीच वाढत राहिली तर 2050 ला मुंबई शहर बुडेल, असे गर्भित भाकीत मॅक्केन्से इंडिया या संस्थेने केले आहे. या
संस्थेचे प्रमुख डॉक्टर शिरीष संख्ये यांनी ( climate crisis: action for tropical costell cities ) क्लायमेट क्रायसिस: ॲक्शन फोर ट्रॅफिकाल कास्टल सिटीज या मुंबईतील परिषदेत हे धक्कादायक निष्कर्ष मांडले. मुंबईसह जगभरातील समुद्र किनाऱ्यावरील शहरे वाचवायची असतील तर प्रदूषण रोखावेच लागेल, असे ते म्हणाले.

मॅक्केन्से इंडियाचे प्रमुख डॉ. शिरीष संख्ये यांनी मुंबईची तुलना व्हियेतनाम, फ्लोरिडा या देशातील समुद्र किनाऱ्याशी केली आहे. तसेच 2050 पर्यंत समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीचा फटका साधारण एक किलोमीटरच्या किनारपट्टीवरील दोन ते तीन लाख लोकांना बसण्याची शक्यता आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

या कालावधीत 0.5 मीटर पर्यंत समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल. यामुळे मुंबईतील पुराची तीव्रता 25 टक्क्यांनी वाढेल. सध्या मुंबईतील पुराची सरासरी खोली 0.46 मिटर आहे, ती 2050 पर्यंत 0.8 मीटर होईल. सध्या शहरात 0.05 मीटर पेक्षा जास्त पूर क्षेत्र 46 टक्के आहे, ते 2050 पर्यंत 60 टक्क्यांवर जाईल. असे सांगून हवामान बदलांवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टर संख्ये यांनी दिला.
यापूर्वी प्रतिष्ठित जर्नल नेचर कम्युनिकेशनने प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार समुद्रातील वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे मुंबई शहर पूर्णपणे नष्ट होऊ शकते. असा धक्कादायक खुलासा केला होता.
या रिसर्चमध्ये शास्त्रज्ञाने सॅटॅलाइट मधून घेतलेल्या फोटोवरून हा निष्कर्ष काढला होता. सॅटॅलाइट च्या मदतीने समुद्राच्या पाण्याची पातळीची गणना केली होती. त्यावरूनही पाण्याची पातळी वाढत असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनात आले. असे न्यूयॉर्क टाइम्स ने म्हटले आहे.

हे सर्व घडण्याचे कारण म्हणजेच प्रदूषण..! प्रदूषणामुळे पर्यावरणाचे हालत गंभीर होत आहे. आणि अशी परिस्थिती निर्माण होत आहे. या परिस्थितीला सामोरे जाताना आपल्याला देखील थोडी काळजी घेणे गरजेचे आहे त्यामुळे प्रदूषण नियंत्रण ठेवणे आणि समतोल राखणं खूप महत्त्वाचं आहे..!

0 comments:
Post a Comment