Secret Success of Disabled..!
![]() |
| दिव्य शक्ती |
माणसाचं आयुष्य खुप सुंदर आहे, त्यांनं ते आनंदाने जगून आनंदमय करावयाचं असतं...! सुख आणि दुःख हे मानण्यात असतं. अनेक वेळेला माणसांच्या आयुष्यामध्ये सुखाच्या क्षणां ऐवजी दुःखाचे क्षण जास्त असतात, तरी सुद्धा माणूस सुखाने जगण्याचा प्रयत्न करत असतो. आयुष्यात कधी हार मानत नसतो.
जगण्यासाठी पर्याय शोधावाच लागतो..
सर्वसाधारणमाणसाच्या आयुष्यात अनेक संकटे येत असतात परंतु कधीकधी माणूस त्या संकटाला सामोरे जाण्यास असमर्थ होऊन जातो. परंतु काही माणसं अशी आहेत की त्यांच्या आयुष्यात जन्मापासूनच अंधार पसरलेला असतो तरी देखील ती व्यक्ती जगण्यासाठी पर्याय शोधत असतात. आणि आपल्या प्रबळ इच्छाशक्ती द्वारे ती माणसं आनंदाने जगत असतात.![]() |
| समर्पण |
व्यक्ती कर्तुत्वानेमोठी होते..
अनेक व्यक्ती आहेत की दिव्यांग आहेत. दिव्यांग व्यक्तींच्या संदर्भात असं ऐकायला मिळतं की त्यांना दिव्य शक्ती प्राप्त झालेली असते, म्हणूनच कधी कधी त्यांच्या हातून किंवा त्यांच्याकडून अशक्य गोष्टी शक्य होत असतात. असे अनेक उदाहरणे आपल्याला समाजामध्ये तसेच जागतिक पातळीवर देखील पहायला मिळतात. असे व्यक्ती आहेत की ज्यांनी जागतिक नोंदी (World Record) केलेल्या आहेत. पण त्यांच्या संदर्भात असं म्हटलं जातं की त्यांना दिव्य शक्ती प्राप्त झाल्यामुळे ते ही कामगिरी करू शकतात किंवा या शिखरावर पोहोचू शकतात![]() |
| समर्पणात यश |
समर्पणात यश सामावलेलं असतं.. ( देशातील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस (IAS) अधिकारी होण्याचा मान प्रांजल पाटील यांना मिळला. तर अरुणिमा सिन्हा (कृत्रिम पायाने) माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली विकलांग महीला.)
परंतु दिव्यांग व्यक्तींच्या संदर्भात हे बोलणं किंवा हा समज पटण्यासारखं नाही. कारण जन्मताच अनेक असे दिव्यांग व्यक्ती असतात त्यातून काही ठराविकच व्यक्ती असतात त्या अतुलनीय कामगिरी करून दाखवतात. आणि अनेक अशा व्यक्ती असतात (तुम्ही किंवा आम्ही समाजामध्ये बघत असतो) ते भीक मागत असताना दिसतात. ट्रेनमध्ये, बाजारात, मंदिराबाहेर अशा व्यक्ती निदर्शनात येत असतात.
जर मग दिव्यशक्ती दिव्यांग व्यक्तींना जन्मताच लाभत असेल तर प्रत्येक व्यक्तीमध्ये ती दिव्य शक्ती असली पाहिजे..! आणि प्रत्येक व्यक्ती अशा दिव्यशक्ती द्वारे कर्तुत्व करून दाखवू शकतो. मग अशा ठराविकच व्यक्ती का असं अद्वितीय कार्य करतात ?
त्याच्या पाठीमागे त्यांचं कर्तृत्व, त्यांचा आत्मविश्वास, त्यांची प्रबळ इच्छाशक्ती, त्यांची मेहनत, त्यांनी घेतलेले कष्ट, हाती घेतलेल्या कार्याबद्दल सकारात्मक भावना, ही कारणं असतात. पण हे आपण कधीच का जाणून घेत नाही?
![]() |
| कठोर परिश्रम |
आणि दिव्य शक्तीच लेबल लावलं जातं..
जेव्हा एखादी दिव्यांग व्यक्ती असं अतुलनीय कामगिरी करत असते तेव्हा आपण सरळ दिव्य शक्तीचे लेबल लावून टाकतो आणि तिने घेतलेल्या कष्टाला, प्रयत्नला, समर्पणाला, त्यागाला दुर्लक्षित करतो, कमी लेखतो. तर तसं नसतं... कारण असे काहीच ठराविक दिव्यांग व्यक्ती असतात ज्या आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर प्रयत्नाने अथक परिश्रम करून एकाग्रतेने तन्मयतेने एखाद्या कार्यात झोकून देतात आणि असं अतुलनीय कार्य करून जातात. पण समाज त्यांना दिव्य शक्ती प्राप्त असल्यामुळे त्यांनी हे करून दाखवलं असं बोलून त्यांच्या कर्तुत्वाला कुठेतरी गालबोट लावण्यासारखं करतो. त्या ठिकाणी त्यांच्या कर्तुत्वाला त्यांचा समर्पणाला कमी लेखलं जातं. काही ठराविक दिव्यांग व्यक्तीच अशी अतुलनीय कामगिरी करत असतात.
![]() |
| इच्छा शक्ती |
कर्तुत्वाला कमी लेखू नका....!
दिव्य शक्ती प्राप्त झाली म्हणून हे करुन दाखवलेलं आहे, असं बोलून त्यांच्या कर्तृत्वाला कमी न लेखता, त्यांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा सन्मान करून त्याचं अभिनंदन करणं, त्यांचं स्वागत करणे हे आपले कर्तव्य आहे.
आणि अशा दिव्यांग व्यक्तींची ही छोटीशी इच्छा असते की कोणीतरी आपली दखल घ्यावी..! आपलं भरभरून कौतुक करावं..! आपल्या पाठीवरून शाबासकीची थाप घ्यावी... ! कर्तुत्वाचा सन्मान करावं आणि समाजामध्ये ताठ मानेने जगायला आत्मसन्मान मिळावा..! हीच त्यांची छोटीशी अपेक्षा असते. जेणेकरून इतर ही दिव्यांग व्यक्ती त्यांना आदर्श मानून असं काही ना काही तरी कर्तुत्व करून दाखवतील...
माझा सलाम अशा सर्व दिव्यांग व्यक्तींना ज्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे....!
धन्यवाद...!
![]() |
| हसतमुखाने स्विकार |






0 comments:
Post a Comment