Air Pollution | असा करा बचाव वायू प्रदूषणा पासून...!
16 Mar 2020 14:29:12
सध्याच्या विज्ञान युगामध्ये मानवाने कितीही शोध संशोधन केली तरीही अशी एखादी आपत्ती अख्ख्या जगावर येते की, त्यापासून विज्ञान देखील बचाव करू शकत नाही. किंवा कोणतीच दैवी शक्ती नाही. एवढी भयानक आपत्ती कधीही येऊ शकते आणि येत असते. सध्या ही आपण जर पाहिलं तर 'कोरोना' (COVID-19) या विषाणूने अख्ख्या जगामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. भारतामध्ये देखील या विषाणूने जबरदस्त एन्ट्री केलेली आहे. आणि बघता बघता कोरोना विषाणू ग्रस्त रुग्णांची संख्या 1000 झालेली दिसते. त्याच्यावर अख्या जगामध्ये उपाय संशोधन चालू आहे. परंतु अजून तरी तसा ठोस उपाय सापडलेला नाही. म्हणूनच वैद्यकीय व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन, पर्यावरण व्यवस्थापन असे सगळे मिळून त्यासाठी बचाव कसा करता येईल या संदर्भात सूचना देत आहेत.
![]() |
Corona virus disease (COVID-19) |
वायुप्रदूषण एक गंभीर समस्या : तरीसुद्धा प्रकर्षाने जाणवत की हे सगळं होत असेल तरीही वायुप्रदूषण हे देखील तितकीच एक गंभीर समस्या बनलेली दिसते. आणि म्हणूनच वायूत प्रदूषणापासून देखील आपल्याला बचाव करणे खूप गरजेचा आहे. आता वायुप्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर कसा प्रभाव पडू शकतो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. कारण प्रदूषण म्हटलं ती धूळ आणि प्रदूषण यामुळे फुपुसाचे आरोग्यावर होणारा परिणाम..! त्यामुळे शरीराची आजारांशी लढण्याची ताकद खूप कमी होते त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये आणि आहारात योग्य तो बदल करून सुधारणा करून आपण स्वतः श्वसन प्रक्रियेला चांगलं बनवू शकतो. त्यावरच काही ठळक उपाय..
![]() |
Fruit Is Life |
'क' जीवनसत्वाचा महत्त्व : लंडनमधील इंपिरियल कॉलेजमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार अस्थमा आणि फुफ्फुसांच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी जर पुरेशा प्रमाणात 'क' जीवनसत्त्व जेवण केलं नाही तर त्यांना दवाखान्यात दाखल करण्याची शक्यता वाढते. 'क' जीवनसत्व अॅंटीआॅक्सिडंट गुण आहे, जो वायू प्रदूषणाचा परिणाम कमी करतो. आंबट फळं आणि पालेभाज्यांमध्ये जीवनसत्व क भरपूर प्रमाणात आढळते. जो वायू प्रदूषणाचा परिणाम कमी करतो. द्राक्ष, आवळा, अननस विषारी घटकांना बाहेर काढतात.
![]() |
Ginger Tea |
आल्याचा चहा : आल्याचा चहा देखील तितकंच महत्त्व आहे. आल्याचा उपयोग आपण पूर्व पार औषध म्हणून करत आलो आहोत. दिवसाची सुरुवातच आपल्याला चहा ने करायची तर त्यावेळेला आल्याचे चहाने सुरुवात करा. संध्याकाळी देखील परत एकदा आल्याचा चहा प्या त्यामुळे स्वास नलिकेतून प्रदूषक घटक बाहेर निघून जातील. तसंच घरातून बाहेर पडताच जिभेखाली लवंग ठेवणं हे देखील फायदेशीर ठरत असतं.
ब्रोकोली : ब्रोकोलीचे देखील आपल्या जीवनात खूप महत्त्व जाणवतं आणि खाण्याने आरोग्य चांगलं राहतं. एका संशोधनानुसार वनस्पतीमध्ये आढळणारा सल्फोराफेन नावाचा घटक ब्रोकोली मध्ये भरपूर प्रमाणात असतो, जो शरीरातील बेंझीन नावाचा घटक बाहेर काढण्यास मदत करतो. बेंझीन हा घटक कॅन्सर कारक आहे आणि फुफ्फुसचे नुकसान करणारा आहे. ब्रोकोली स्प्राऊट्स आणि ब्रोकोलीचे सूप पिण्याने विषारी घटक बाहेर येतात.
ह्या आणि अशाच काही टिप्स जर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये अमलात आणल्या तर आपल्या आरोग्य ला एक संरक्षण कवच मिळू शकतो, आणि त्यामुळे संसर्गजन्य रोग, आजार यांच्या विषाणूपासून आपण आपला बचाव करू शकतो
0 comments:
Post a Comment