Alzheimer | अरे बापरे...! हा आजार तर सर्व काही विसरायला लावतो..
![]() |
Alzheimer disease symptoms |
हो...! असे काही आजार आहेत याची आपल्याला काहीही कल्पना नसते. आणि तो आजार जडला तर आपण संभ्रमात पडतो की आपल्याला किंवा आजारी व्यक्तीला झाले तरी काय ? कि ती अशा पद्धतीने वागत असते, वावरत असते. जगाच्या पाठीवर जर पाहिलं तर असे अनेक आजार आहेत याची आपल्याला कल्पना नसते, आणि माहिती देखील नसते. अशाच एका आजार संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया...! हा आजार आहे 'अल्झायमर'
अल्झायमर: अल्झायमर म्हणजे काय ? अल्झायमर चे परिणाम काय असतात ? अल्झायमर आजार म्हणजे काय ? त्याचा शोध कोणी लावला ? कारणं काय आहेत आणि त्या आजारावर उपाय काय ? याविषयी आपण जाणून घेऊया 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्जाइमर दिन म्हणून ओळखला जातो.
अल्झायमर: अल्झायमर म्हणजे काय ? अल्झायमर चे परिणाम काय असतात ? अल्झायमर आजार म्हणजे काय ? त्याचा शोध कोणी लावला ? कारणं काय आहेत आणि त्या आजारावर उपाय काय ? याविषयी आपण जाणून घेऊया 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्जाइमर दिन म्हणून ओळखला जातो.
अॅलोइस अल्झेमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने 2006 सली या आजाराचा शोध लावला. आणि म्हणूनच ह्या आजाराला अल्झायमर असं नाव देण्यात आले. मेंदूतील पेशींची गुंतागुंत आणि चमत्कारिक गुठल्या अशा अवस्थेत एका मृत स्त्रीचा मेंदू त्याच्यावर त्याने अभ्यास केला. ती एका स्मरणशक्तीच्या विचित्र लक्षणांमुळे मृत झाली होती. त्या लक्षणाचा संबंध तिच्या मेंदूच्या रचनेशी असल्याचा तर्क करणारा हा जगातील पहिला शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाऊ लागला.
![]() |
Complexity of brain cells |
आजारात विस्मृती (विसरणारी वृत्ती ) वाढत जाते. सुरुवातीला एखाद्याचे नाव विसरणं, जेवण खाणे-पिणे विसरणे, अशाप्रकारच्या लक्षणांमध्ये वाढ होत जाते. ह्या आजाराची सुरुवात मेंदूमध्ये झाल्यानंतर दहा वर्षे उलटल्यानंतर मगच त्याची सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात. असा शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. 65 वर्षे वयानंतर शेकडा 20 टक्के लोकांमध्ये हा आजार होण्याची शक्यता असते. असा निष्कर्ष अभ्यासातून समोर आलेला आहे.
अजून तरी ह्या आजारावर नक्की असा ठोस उपाय सापडलेला नाही. मुळात त्याचं कारण हेच माहित नाही तर उपचार करणार तरी कशाच्या आधारावर ? कारण या आजाराची लक्षणे काय आहेत हे समजू शकले नाहीत. या आजाराचे निदान करण्यासाठी फक्त लक्षणाचा आधार घ्यावा लागतो. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रसामग्री पण विशेष उपयोगी पडत नाही.
![]() | |||
Is more commonly found in the context of older persons |
अल्झायमरची अनेक लक्षण..
सामान्यतः 65 वर्षं अधिक वयाच्या व्यक्तींना आपल्या जाळ्यात अडकविणार्या अल्झायमरची अनेक लक्षण आहेत पण प्रत्येक व्यक्ती दिसणारी लक्षणे वेगळी आहेत. लक्षणांकडे लक्ष द्या जेणेकरून वेळेवर इलाज होऊ शकतो.
60 टक्के केसेसमध्ये याचं परीक्षण होत नाही. चांगली देखभाल, घरी असणाऱ्या पीडित व्यक्तीची उत्तम काळजी घेणे. लक्षणे लक्षात घेऊन दुर्घटनेपासून बचाव करू शकता.
ह्याच्या मधली काही लक्षणं पाहूयात ह्याच्या मध्ये सर्वात प्रथम..
स्मरणशक्ती कमी होणे : अल्झायमरचं सगळ्यात प्रमुख लक्षण म्हणजे जाणाऱ्या स्मृतीचा आपल्या दैनंदिन कार्य वर होणारा परिणाम दिसत असलं तर डॉक्टरांची त्वरित भेट घ्या.
घरगुती कामात समस्या : आपल्या सगळ्यांनाच काम करताना समस्या जाणवते, पण अशा व्यक्तींना रोजची काम करताना समस्या जाणवते.
वेळ आणि जागा : या दोन्हीच्या बाबतीत काहीच आठवत नाही. अगदी ऑफिसचा ठिकाण, घराचा पत्ता हि विसरला जातो.
व्यक्तिमत्त्वात बद्दल : या आजाराने ग्रस्त व्यक्ती नैराश्य आणि भयाने त्रस्त असते.
समस्या: अशा व्यक्तींना सोपे सोपे प्रश्न सोडवता येत नाहीत.
फोटो आणि जागा : एखादी व्यक्ती एखादी जागा किंवा वस्तू ओळखण्यास असमर्थ असेल तर तो आजाराने ग्रस्त आहे, असं समजावं.
शब्द ओळखण्यास समस्या : काही जणांना हे समजत नाही की, ते काय लिहित आहेत किंवा कोणत्या शब्दांचा वापर करायला हवा.
गोष्टी चुकीच्या ठिकाणी ठेवतात : गोष्टी चुकीच्या ठिकाणी ठेवतात आणि चुकीच्या ठिकाणी शोधतात.
या लक्षणांकडे लक्ष द्या वेळेवर इलाज झाल्यास नियंत्रणात येऊ शकतो..
आजारांची माहिती असणे खूप गरजेचे...
अशाच अनेक आजारांवर आपण माहिती घेणार आहोत. असेच नवनवीन प्रकारचे आजार आपल्यासमोर येत असतात. आणि त्याची माहिती आपल्याजवळ असणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून कुणास ठाऊक कधी आपल्या कुटुंबातील व्यक्तीला एखाद्या आजाराने त्रास झाला तर आपण त्याला ओळखू शकतो की निश्चित तो कोणत्या आजाराने त्रस्त आहे. तेव्हा अशा अनेक आजारांची माहिती आपल्याजवळ असणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून आपण त्याची योग्य ती काळजी घेऊन योग्यवेळी त्याच्यावर आपण उपचार करू शकतो..
0 comments:
Post a Comment