f Secret Success of Disabled | ह्या दृष्टिहीन मुलीने कमालच केली...! | ThinkDum

Secret Success of Disabled | ह्या दृष्टिहीन मुलीने कमालच केली...!



 Secret Success of Disabled | ह्या दृष्टिहीन मुलीने कमालच केली...!


Motivational Story, Secret Success of Disabled | ह्या दृष्टिहीन मुलीने कमालच केली...!
अपंगांचे गुप्त यश


जगात माणसा एवढा बुद्धिमान प्राणी कोणी नाही हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. आणि होत आहे. माणसाची विचारशक्ती, बुद्धिमत्ता ईतकी प्रबळ आहे, की विज्ञानावर मात करू पाहत आहे. कधीकधी ही बुद्धिमत्ता एवढी प्रबळ होऊन जाते की आपणही चकित होऊन जातो. अशी एखादी व्यक्ती कर्तृत्व करून जाते. अशी अनेक उदाहरण आपण पाहत असतो. 

मागच्या लेखांमध्ये आपण अरुणिमा सिन्हा स्टोरी ऐकली असेल आर्टिफिशिअल पायाने देखील माऊंट एव्हरेस्ट सर करणारी भारतातील पहिली महिला ठरली. अशाच प्रकारे आणखी एक मुलींनं असा चमत्कार करून दाखवला आहे की, आश्चर्य करण्याव्यतिरिक्त आपण काहीच करू शकत नाही. एवढे जबरदस्त महत्वकांशा असणारी ही मुलगी चक्क आईएएस (IAS) ऑफिसर झाली तिही दृष्टिहीन असून देखील... आहे की नाही कमाल..?

Overcoming Blindness, Secret Success of Disabled | ह्या दृष्टिहीन मुलीने कमालच केली...!
दृष्टिहीन: प्रांजल पाटील


जबरदस्त महत्वकांशा...

प्रांजल ही मुळची उल्हासनगर मधली. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण तिने दादरच्या कमला मेहता अंधशाळेत घेतलं. हे शिक्षण घेताना देखील तिला आणि तिच्या आई-वडिलांना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागलं. तरी सुद्धा तिने आपलं दहावीचे शिक्षण पूर्ण केलं. तेही चांगले मार्क मिळवून. त्यानंतरच शालेय जीवन ठाण्याच्या चंदाबाई कॉलेजमधून कला शाखेतून अनंत अडचणींना तोंड देत. वेळप्रसंगी आई वडिलांचा धिर सुटायचा, पण महत्त्वकांक्षी प्रांजल ने आपला धिर कधीच सोडणार नाही. आणि बारावी परीक्षेत 85 टक्के गुण मिळवून ठाण्यात पहिली आली. तेव्हा आई-वडिलांचा कष्टाचे चीज झाले असे त्यांना जाणवलं. त्या नंतरचा शिक्षण तिने मुंबईतल्या सेंट झेविअर्स महाविद्यालयात प्रवेश घेऊन तिथं पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. त्यावेळी देखील ती एका विषयात पहिली आली. यामध्ये प्रांजल चे आणि तिच्या कुटुंबाचे प्रचंड कष्ट होते. शिक्षण घेत असतानाच तिने आणि तिच्या एका मित्राने पहिल्यांदाच यूपीएससी (UPSC) संबंधी एक लेख वाचला होता.


त्यानंतर प्रांजल ने यूपीएससी (UPSC) परीक्षेसंदर्भातील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिने आपल्याला आयएएस (IAS) अधिकारी व्हायचंय हे कुणालाही सांगितलं नाही पण मनाशी निश्चय केला होता की आपण आयएएस (IAS) अधिकारी व्हायचंच. पुढील शिक्षण तिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) दिल्ली येथून एम.ए., एम फिल. आणि पीएचडीचा प्रबंध पूर्ण केला. तेव्हा च तिने नेट-सेट परीक्षा सुद्धा दिली त्यातही ती पास झाली. नंतर तिने नागरी सेवा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. कम्प्युटरवर स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घेतला.


दृष्टिहीन लोकांसाठी असलेल्या जॉब एक्सेस वीथ स्पीच या विशेष सॉफ्टवेअरची मदत घेतली या सॉफ्टवेअरमुळे स्क्रीन वरच्या गोष्टी तीला ऐकता येत. हे सर्व करत असताना तिला खूपच त्रास व्हायचा आणि भीती देखील वाटायची.डोळे तर गेलेत आणि कानान काही दुखापत झाली तर. पण म्हणतात ना मनात इच्छाशक्ती असेल तर मग अडीअडचणींना सामोरे जाताना आपल्याला काहीच वाटत नाही. आत्मविश्वास मिळत असतो. तसाच आयएएस (IAS) अधिकारी व्हायचे हा दृढनिश्चय तिला स्वस्थ बसू देत नव्हता.

आपल्या प्रयत्नातून ती (UPSC) यूपीएससी ची पहिल पूर्व आणि मुख्य परीक्षेला ती पास झाल्यानंतर अथक प्रयत्नातून ती मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाली. मुलाखत दिली आणि पहिल्या प्रयत्नात तिने 773 वा क्रमांक घेऊन यश मिळवलं. नंतर ती मुख्य परीक्षेला बसली आणि मुलाखत ही दिली त्यातही ती पास झाली, आणि तिला 124 रॅंक मिळाला. अशाप्रकारे देशातील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस (IAS) अधिकारी होण्याचा मान प्रांजल पाटील यांना मिळला...

 ..मिळला नाही तर त्यांनी अथक प्रयत्नातून, प्रबळ च्छाशक्ती द्वारे मिळवला. प्रांजल पाटील यांनी तिरुवनंतपुरम येथे उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. प्रांजल केरळ मध्ये होणाऱ्या पहिल्या दृष्टिहीन (IAS)आयएएस महिला अधिकारी झाल्या. प्रांजल ने दाखवून दिलं की कष्ट आत्मविश्वास आणि जिद्द जर आपल्या मध्ये असेल तर आपण कोणत्याही गोष्टीत कमी पडत नाही. आणि जे आपल्याला शक्य नसतं ते आपण शक्य करून दाखवतो.


The first blind IAS female officer, Secret Success of Disabled | ह्या दृष्टिहीन मुलीने कमालच केली...!
पहिल्या दृष्टिहीन आयएएस महिला अधिकारी 



अशा पद्धतीने ही देखील एक स्त्री असून सुद्धा करून दाखवलं ते आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर... अशी अनेक उदाहरण आहेत हे आपण पाहतच असतो. पण त्यातूनच प्रेरणा घेऊन आपण आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना कार्टून आणि टीव्ही शो दाखवण्यापेक्षा अशा व्यक्तींची तुम्ही त्यांना जर माहिती उपलब्ध करून दिली व्हिडीओ स्वरुपात त्यांना ऐकवलं तर त्यांच्यात सुद्धा आत्मविश्वास निर्माण होईल. त्यांनाही प्रेरणा मिळेल की अशा अपंग व्यक्ती जर असं जागतिक रेकॉर्ड करत असतील तर आपण ही काही तरी करु शकतो. ते सुद्धा एक ठाम निश्चय करतील, की आपण सुद्धा काहीतरी करून दाखवू शकतो. आणि जर का मुलांना आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांनी जर जिद्द ठेवली तर त्यांच्या सुद्धा मनामध्ये त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये असे चमत्कार घडू शकतात. म्हणून मुलांना कार्टून टीव्ही शो दाखवण्यापेक्षा आपल्या मोबाईल मध्ये असेच व्हिडिओ अपलोड करून ठेवा की जेणेकरून मुलांना कार्टून बरोबर तेही व्हिडिओ दाखवता येतील...
धन्यवाद....!

SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment