credit: third party image reference
जगात सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश म्हणजे चीन. चीन च्या नंतर दोन नंबर व सर्वात जास्त लोकसंख्या आहे भारताची. एक काळ असा होता की भारताची लोकसंख्या नियंत्रित करणं खूप गरजेचं होतं. त्यावेळेला घोषवाक्य निघालं होतं "हम दो हमारे दो" त्यामुळे थोडं का होईना पण भारताची लोकसंख्या वाढीमध्ये थोडसं नियंत्रण मिळाले.
आज असे ऐकायला मिळते की मुलांना जन्म द्या आणि दीड लाख रुपयांचा बोनस मिळावा..!
आज असे ऐकायला मिळते की मुलांना जन्म द्या आणि दीड लाख रुपयांचा बोनस मिळावा..!
आहे ना आश्चर्याची गोष्ट..?
credit: third party image reference
हो खर आहे हे..! भारत आणि चीन सारखे देश लोकसंख्या वाढीमुळे त्रस्त असताना काही देशांत मात्र कमी लोकसंख्येच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच ग्रीस देशाने आता बेबी बोनस नावाची योजना जाहीर केली आहे. ग्रीस नागरिकांनी मुलांना जन्म दिल्यास या योजनेअंतर्गत त्यांना पैसे मिळणार आहेत.
credit: third party image reference
घटता जन्मदर ही ग्रीस देशाची गंभीर समस्या बनली आहे. ग्रीसमध्ये वेगाने कमी होणारी लोकसंख्या लक्षात घेत सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर संबंधित पालकांना सरकारकडून 2000 युरो देण्यात येणार आहेत. भारतीय चलनात त्याची रक्कम सुमारे दीड लाख रुपये आहे. या योजनेसाठी सरकारने चौदाशे कोटींचा निधी मंजूर केला आहे.
credit: third party image reference
ग्रीस शिवाय इतरही काही देशांमध्ये बेबी बोनस योजना सुरू आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, czech रिपब्लिक, फ्रान्स, इटली आणि पोलंड इत्यादी देशांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियात बोनस म्हणून पाच हजार डॉलर म्हणजे जवळपास दोन लाख 38 हजार रुपये देण्यात येतात.
credit: third party image reference
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार ग्रीस लोकसंख्याही जवळपास एक कोटी असून लोकसंख्येच्या संख्येत घट होत आहे. जन्मदर न वाढल्यास येत्या तीस वर्षात या देशातील लोकसंख्या 30 टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याचे अहवाल नमूद करण्यात आले आहे. ग्रीसमध्ये 2050 पर्यंत 36 टक्के लोकांचे वय 65 वर्षे होणार आहे त्यामुळे सरकारने भविष्याची गरज म्हणून ही 'बेबी बोनस' जाहीर केला आहे.
0 comments:
Post a Comment