Wo Bulati Hai | मगर जाने का नहीं..!
![]() |
| Wo Bulati Hai.. |
माणसाला आपलं आयुष्य सुखासमाधानाने जगता यावं म्हणून माणूस अनेक तडजोड करु लागला आहे. आपलं कुटुंब, आपला परिवार कसं सुखी राहील याच्या कडे जास्त लक्ष देतोय, म्हणूनच कि काय एकत्र कुटुंब पद्धती लयास जाऊन आज विभक्त कुटुंब पद्धती उदयास आलेली आहे. प्रत्येक जण फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करू लागला आहे. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती जवळजवळ नाहीशी झालेली दिसते. दोन-तीन दशकापूर्वी माणसाचं कुटुंब एकत्र कुटुंब पद्धतीमुळे खूप मोठं असायचं, तरीसुद्धा प्रत्येक जण सुखासमाधानाने राहत असे, आणि तो आनंद सर्वजण उपभोगत असत.
परंतु आजच्या जमान्यात एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी झालेली दिसत असताना विभक्त कुटुंब पद्धती उदयास आलेली दिसते. त्याचं कारण हेच की माणूस आपलं कुटुंब, आपली मुलं याचाच फक्त विचार करु लागला आहे. हा विचार करताना देखील माणूस कधीकधी अडचणीत येऊ लागलेला दिसतो. आणि त्याचं कारणही तसंच आहे. कारण माणसाला आयुष्यामध्ये अनेक गोष्टींचं व्यसन जडलेले दिसतं आणि ते व्यसन जडलं की माणूस कधी रसातळाला पोहोचतो हे त्यालाही कळत नाही. त्याचबरोबर त्याचा परिणाम त्याच्या मुलाबाळांवर, आई-वडिलांवर, पत्नीवर म्हणजेच कुटुंबावर जाणवू लागतो. त्याचे हेच कारण आहे की व्यसन..! मग ते व्यसन सिगरेट, दारू, गुटखा, जुगार, मटका यापैकी कोणत्याही गोष्टीचं असुदे माणुस एकदा का व्यसनाधीन झाला की पुर्ण कुटुंबच उध्वस्त होतं.
त्यातच दारूचं व्यसन कुटुंबासाठी खुपचं हानीकारक आहे. हेच व्यसन जास्त आकर्षित करु लागतो. आणि एक वेळ अशी येते की त्याच्या शिवाय माणूस जगु शकत नाही. अशी अवस्था व्यसनाधीन व्यक्तीची होते. ते व्यसन सतत त्याला खुणावत असतं. तो बेचैन होतो. म्हणूनच असं म्हणावसं वाटतं की..."वो (दारु) बुलाती है.. मगर जाने का नाहीं..!"
आपलं कुटुंब सुखी राहायचं असेल आपल्या मुलाबाळांचे भविष्य उज्वल करायचा असेल तर, ह्या गोष्टी पासून अलिप्त रहा..! ही व्यसनं जी आहेत ती आपल्याला आकर्षित करीत असतात, बोलावत असतात पण त्याच्याकडे दुर्लक्ष करा ! तुम्ही त्यात फसू नका...! भलेही ती बोलवत असेल परंतु तुम्ही तिथं जाऊ नका..! म्हणजेच वो बुलाती है मगर जाने का नाहीं..! हे जर तुम्ही ब्रीदवाक्य मनात ठामपणे रुजवलं आणि आपला आयुष्य सुखाने जगण्याचा प्रयत्न केलात तर नक्कीच तुमच्या अनेक अडचणी सुटतील आणि तुमचा आयुष्य तुमचा मुलांचे आयुष्य खूपच सुख-समाधानाचे जाईल ह्यात तिळमात्र शंका नाही.

मुलांमध्ये मन गुंतवा...!
हे व्यसन सोडवण्यासाठी आपण स्वतःहून प्रयत्न केलं तरी त्यात यश मिळतं. व्यसनमुक्ती केंद्र सुद्धा आता अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु ते व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये जाण्यापेक्षा आपण जर आपल्या मनावर कंट्रोल केलं आपलं मन इतर गोष्टींमध्ये गुंतवलं तरी थोडंफार का होईना तुम्ही त्यातून मुक्त व्हाल. आजकाल अनेक करमणुकीची साधने उपलब्ध आहेत त्यामध्ये आपलं मन गुंतवा आणि आपल्या मुलाबाळांना आनंद कसे मिळेल याकडे लक्ष द्या..!
credit: third party image referenceकुटुंबाकडे लक्ष केंद्रित करा...!
कुटुंबाकडे आपण लक्ष दिले तर त्या गोष्टींची जाणिव होणार नाही. कुटुंबाला सुखी समाधानी जीवन जगता यावे म्हणून तुम्ही त्यावरच लक्ष केंद्रित केलं तरी तुमचं मन आपसूकच कंट्रोल मध्ये राहील. मुलांच्या भविष्या कडे बघत राहिलात आपल्या मुलाबाळांना नजरेसमोर ठेवलं आणि त्यावरच आपले लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला कधीच या गोष्टीची आठवण होणार नाही. आणि तुम्हाला हळूहळू या गोष्टी पासून अलिप्त राहता येईल.
credit: third party image reference
तुम्ही तुमचा भुतकाळ आठवा..! कधीतरी स्वतः अनुभव घेतला असेल की अनेक वेळेला तुम्ही कोणत्या आणि कशा अडचणीला सामोरे गेला आहात या अडचणी कशामुळे निर्माण झाले आहेत याचे विश्लेषण करा..! आत्मपरीक्षण करा..! आणि हा गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा..!
बुलाती है मगर जाने का नाही..!
बुलाती है मगर जाने का नाही..!
हे आपल्यावर असते त्यासाठी आपलं कुटुंब आपलं सुखी परिवार आनंदित राहण्यासाठी तुम्ही त्या कोणत्याही व्यसनाच्या आधीन होऊ नका..! आणि आपलं मिळालेले आयुष्यात मुलांचं भविष्य कडे लक्ष द्या..! कारण मुलांच्या सर्व आशा-आकांक्षा तुमच्यावरच अवलंबून असतात. तेव्हा तुम्ही मुलांच्या भविष्यावर त्यांच्या सुखी जीवनावर लक्ष केंद्रित करा..! एवढे जरी केलं तरीही तुम्ही व्यसनमुक्त होऊ शकता..!
धन्यवाद..!


Bhari
ReplyDeleteThank you Dear..!
DeleteMastasch
ReplyDeleteThank you
Delete